04/09/2025, 07:51 pm
गावातील प्रत्येक घराला नळ जोडणी देण्यात आली आहे.दर घराला प्रतिदिन सुमारे 55 लिटर पाणी मिळते, पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे.पाणीपुरवठा मोटरवर सौर कनेक्शन केले गेले आहेत.
10/09/2025, 07:55 am
गावातील एकूण 68 पथदिवे 100% LED लाइटसह बसवले आहेत.3 हाय मास्ट दिवे बसवून रात्रीची सुरक्षा आणि प्रकाश सुधारण्यात आला आहे.
14/08/2025, 10:15 am
गावात प्लास्टिक बंदी प्रभावीपणे राबविण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला कापडी पिशव्यांचे वाटप करून पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन दिले गेले असून गावात स्वच्छता व आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे.
12/09/2025, 06:29 am
गावात दारूबंदी लागू करून व्यसनमुक्तीची दिशा दिली गेली आहे. महिलांच्या पुढाकाराने सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ही मोहीम यशस्वी केली असून त्यामुळे गावात सामाजिक ऐक्य, शांतता व आरोग्यदायी वातावरण निर्माण झाले आहे.
14/08/2025, 03:08 am
गावात घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. चालू वर्षात मोठ्या प्रमाणावर घरकुल बांधकाम सुरू असून यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना सुरक्षित निवासाची सोय झाली आहे. या योजनेमुळे गावातील सामाजिक आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळत आहे.