पिंपरखेड हे नाव दंतकथेनुसार गावात खूप पिंपळाचे झाडे होते व त्यावरून पिंपळ शब्दाचा अपभ्रंश होऊन पिंपरखेड हे नाव पडले.आमच्या गावातील ग्रामपंचायतीची स्थापना ग्रामपंचायत कायदा 1958 नुसार 1967 साली झाली.आमच्या गावात मारुती मंदिर, ग्रामदैवत खंडेराव मंदिर, भवानी माता मंदिर, मरीआई मंदिर, महादेव मंदिर व नवनाथ महाराज मंदिर इतके देऊळ आहेत.
आमची गावची लोकसंख्या 1938 आहे. आमच्या गावात महिला सक्षमीकरणासाठी पहिल्या महिला बचत गटाची स्थापना 2017 साली झाली.आणि 2021 साली 13 गट स्थापन झाले. हर घर जल योजनेच्या अधीन आमच्या गावात प्रत्येक घराला नळ जोडणी देण्यात आली आहे.
गावात सिमेंट काँक्रिटी करण करण्यात आले. भूमिगत गटारी बांधण्यात आल्या. गावात विजेचे दिवे लावण्यात आले.गावातील अंगणवाडी साठी ग्रामपंचायती कडून कपाट, सॅनिटायझर पॅड, खुर्च्या, मुलांना खेळणी, टेबल इत्यादी वस्तू देण्यात आल्या. शाळेच्या आवारात पेवर ब्लॉक करणे स्मशानभूमी सुशोभीकरण
गावात 3 हाय मास्ट दिवे बसवण्यात आले. गावात एकूण 68 पथदिवे असून त्यावर सर्व लाईट एलईडी बसवण्यात आलेले आहे गावातील नळ पाणीपुरवठा योजनेच्या मोटर सौर कनेक्शन वर करण्यात आलेले आहेत हर घर जल योजनेअंतर्गत प्रत्येक घराला प्रतिमांशी 55 लिटर पाणी मिळत असून पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. आदिवासी वस्तीमध्ये काँक्रिटी करण करण्यात आले.गावात दरवर्षी गुढी पाडव्याला खंडेराव महाराज यात्रा उत्सव असतो.
गावात महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाची इयत्ता 10 वी पर्यंत शाळा आहे.जिल्हा परिषद शाळा इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत आहे व माध्यमिक शाळा पाचवी ते दहावीपर्यंत आहे.गावात "एक पेड माँ के नाम" योजना राबवण्यात आली.आमच्या गावात घरकुल योजना अतंर्गत चालू वर्षात ११४ घरकुल बांधकाम चालू आहे. अपंग व्यक्तींना शासनाच्या अपंग व्यक्ती योजनेचा ग्रामपंचायती कडून लाभ देण्यात आला.
गावात ग्रामपंचायती कडून दरवर्षी मेडिक्लोर वाटप करण्यात येते. क्लोरिन जल ड्रॉप दरवर्षी वाटप करण्यात येतात.गावात पथदिवे 100% led लाईट बसवण्यात आले आहेत गावात मागच्या वर्षी दारूबंदी करण्यात आली असून गावातील सर्व महिलांनी एकत्र येऊन दारूबंदी केली आहे गावात प्लास्टिक बंदी व्हावी या साठी गावातील कुटूंबाना ग्रामपंचायत तर्फे कापडी पिशवी चे वाटप करण्यात आले गावातील महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात गावातील महिला व मुलींसाठी शिवण क्लास ब्युटी पार्लर हिमोग्लोबिनची तपासणी रक्तदान प्रशिक्षण हळदी कुंकू सारखं कार्यक्रम रानभाज्या प्रदर्शन आरोग्य तपासणी यासारखे विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत
सरपंच
सौ. सोनाली सुनील मोरे या पिंपरखेड गावाच्या सरपंच म्हणून ग्रामपंचायतीचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या कार्यकाळात गावात पाणीपुरवठा, रस्ते, गटारी, LED पथदिवे, शाळा व अंगणवाडी सुविधा, हर घर जल योजना, घरकुल योजना अशा अनेक शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गट, शिवणकला व ब्युटीपार्लर प्रशिक्षण, आरोग्य तपासणी शिबिरे, हळदीकुंकू कार्यक्रम असे उपक्रम राबवून गावातील महिला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणल्या.
त्यांच्या नेतृत्वाखाली गावात दारूबंदी, प्लास्टिक बंदी, “एक पेड माँ के नाम” योजना अशा सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामविकासासोबत सामाजिक बांधिलकी जपत सौ. मोरे यांनी पिंपरखेड गावाला आदर्श ग्रामपंचायत बनविण्याचा संकल्प हाती घेतला आहे.
13/09/2025, 05:28 pm
दरवर्षी मार्गशीर्ष दशमीला खंडेराव महाराज यात्रेचे आयोजन केले जाते.गावातील प्रत्येक घरातून बैल रथाला जोडले जातात आणि यात्रा मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते.
26/09/2025, 07:31 pm
गावात गुढीपाडवा उत्सव साजरा केला जातो, जिथे ग्रामस्थ एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने साजरे करतात.
04/09/2025, 09:35 am
महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केला जातो, ज्यामध्ये विविध सांस्कृतिक उपक्रम आणि रानभाज्या प्रदर्शन होते.
पिंपरखेड ग्रामपंचायतमार्फत प्रत्येक घराला शुद्ध नळपाणी पुरवठा होतो.
ज्वारी, तूर, ऊस व भाजीपाला अशी जिरायती व बागायती पिके घेतली जातात.
पिंपरखेड गावात प्राथमिक ते माध्यमिक व आदिवासी शाळेची सोय आहे.
गावात प्राथमिक आरोग्य सुविधा व आरोग्य शिबिरे आयोजित होतात.
पिंपरखेड गावात सर्व LED पथदिवे व ३ हाय मास्ट दिवे आहेत.
मारुती, खंडेराव, भवानी माता, मरीआई, महादेव व नवनाथ महाराज मंदिर आहेत.
गावात महिला बचत गट, शेतकरी गट व सामाजिक उपक्रम चालवणाऱ्या संघटना आहेत.
मारुती मंदिर गावातील प्रमुख धार्मिक स्थळ आहे. येथे दरवर्षी उत्सव व विशेष पूजा मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. मंदिर परिसर स्वच्छ आणि निसर्गरम्य आहे.
खंडेराव मंदिर गावाचे ग्रामदैवत असून येथे दरवर्षी मार्गशीर्ष दशमीला खंडेराव महाराज यात्रा भरते. यात्रा काळात गावात उत्सवाचे वातावरण निर्माण होते.
भवानी माता मंदिर गावातील महिलांचे श्रद्धास्थान आहे. येथे नवरात्र व अन्य धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात.